You are currently viewing वेंगुर्ल्यात २८ आणि २९ला जिल्हास्तरीय नेमबाजी स्पर्धा

वेंगुर्ल्यात २८ आणि २९ला जिल्हास्तरीय नेमबाजी स्पर्धा

वेंगुर्ल्यात २८ आणि २९ला जिल्हास्तरीय नेमबाजी स्पर्धा

वेंगुर्ले

सिंधुदुर्ग जिल्हा शूटिंग असोसिएशन,सिंधुदुर्ग व उपरकर शूटिंग अकॅडमी,सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य जिल्हास्तरीय नेमबाजी स्पर्धेचे आयोजन उपरकर शूटिंग अकॅडमी वेंगुर्ला, कॅम्प येथे करण्यात येणार आहे.या स्पर्धा ओपन साईट, पीप साईट व एअर पिस्तूल या प्रकारात घेण्यात येतील तसेच या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी वयोमर्यादा 16 वर्षाखालील गट व 16 वर्षावरील खुला गट पुरुष व महिला असा असेल. स्पर्धेसाठी लागणारी पॅलेट, टारगेट, रायफल, पिस्तूल आयोजकांकडून स्पर्धेच्या ठिकाणी दिल्या जातील ही स्पर्धा दिनांक 28 व 29 रोजी घेण्यात येणार आहे प्रवेश फी 100 रुपये मात्र आकारण्यात येईल. विजेत्या नेमबाजांना पदक, प्रशस्तीपत्र, उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या प्रशालेस/ विद्यालयास जनरल चॅम्पियनशिप व रनर अप ची ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात येईल.तसेच सहभागी स्पर्धेकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल.नाव नोंदणी दिनांक 25 तारीख पर्यंत करावयाचे आहे. संपर्क- 9527417680/9421145116.

प्रतिक्रिया व्यक्त करा