*ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ.कविता किरण वालावलकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*उस्ताद झाकीर हुसैन: हरवलेला ताल*
अश्रू ढाळताना दिसला
स्टुडिओ मधला तबला
हरवलेला आहे ताल
त्याच्या अस्तित्वातला
आता काय ऐकवू मी
असे जणू तबला सांगतो
थांबला तबल्याचा ताज
एकटा सभागृहात रडतो
वाटे मजला स्वप्नच ते
स्वप्नात सारे असावे खोटे
तबल्याला असेच वाटते
झाले त्याचेच जग छोटे
आता ऐकण्यासारखे
उरलेच नाही तो जाणतो
कलेच्या विश्वात आताच
श्वास हा त्याचा कोंडतो
सौ कविता किरण वालावलकर
दावणगिरी कर्नाटक