You are currently viewing कुडाळ शहरात होणार जिल्ह्यातील पहिली डिजिटल अंगणवाडी

कुडाळ शहरात होणार जिल्ह्यातील पहिली डिजिटल अंगणवाडी

*कुडाळ शहरात होणार जिल्ह्यातील पहिली डिजिटल अंगणवाडी*

▪️नगरसेवक मंदार शिरसाट यांची पत्रकार परिषदेत माहिती.

कुडाळ

कुडाळ शहरामध्ये लवकरच सिंधुदुर्ग जिल्हयातली पहिली डिजिटल अंगणवाडी होणार आहे, अशी माहिती कुडाळचे नगरसेवक मंदार शिरसाट यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. यावेळी नगराध्यक्ष अक्षता खटावकर, उप नगराध्यक्ष किरण शिंदे, नगरसेवक संतोष शिरसाट, नगरसेवक उदय मांजरेकर, नगरसेविका श्रुती वर्दम, नगरसेविका सई काळप, नगरसेविका श्रेया गवंडे, नगरसेविका ज्योती जळवी उपस्थित होत्या. यावेळी बोलताना मंदार शिरसाट म्हणाले की, आजच्या डिजिटलच्या युगात शालेय विद्यार्थी वर्गाला सुद्धा डिजिटल प्रणालीची माहिती असणे आवश्यक आहे. त्यामुळे कुडाळमध्ये जिल्ह्यातील पहिली डिजिटल अंगणवाडी सुरू करण्यात येईल. कुडाळ शहरांमध्ये साधारण १४ अंगणवाडी शाळा आहेत. या अंगणवाडी शाळेमध्ये साधारण २०० पेक्षा जास्त मुले शिकत आहेत. या मुलांसाठी येणाऱ्या काळामध्ये आम्ही सर्व नगरसेवकांच्या माध्यमातून आणि माजी खासदार विनायक राऊत तसेच माजी आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून कुडाळ शहरांमध्ये एक डिजिटल अंगणवाडी उभारणार आहोत. ही अंगणवाडी जिल्हयांतील पहिलीच डिजिटल पद्धतीची असणार आहे, असे मंदार शिरसाट यांनी शेवटी सांगितले.
https://www.facebook.com/share/p/15jnkYzhS6/

प्रतिक्रिया व्यक्त करा