You are currently viewing शासकीय सेवा व योजनांच्या महामेळाव्याचे आयोजन

शासकीय सेवा व योजनांच्या महामेळाव्याचे आयोजन

शासकीय सेवा व योजनांच्या महामेळाव्याचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी 

  महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्ग, जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग व सिंधुदुर्ग जिल्ह्यतील सर्व वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने  रविवार दि. 22 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 10 वाजता बँ.नाथ पै‍ शिक्षण संस्था, एम.आय.डी,पिंगुळी ता. कुडाळ येथे शासकीय सेवा व योजनांचा महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटन समारंभ न्यायमूर्ती उच्च न्यायालय, मुंबई तथा पालक न्यायमूर्ती  नितीन बोरकर,  प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष हेमंत गायकवाड यांच्या हस्ते होणार आहे.

या कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी अनिल पाटील, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती पुजार, पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, महाराष्ट्र ॲण्ड गोवा बार कौन्सिल चे अध्यक्ष ॲङ संग्राम देसाई, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲङ परिमल नाईक आदी उपस्थितीत राहणार आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा