You are currently viewing २२ व २३ डिसेंबरला सिंधुदुर्ग आंबोली सैनिक स्कूलचा वर्धापन दिन

२२ व २३ डिसेंबरला सिंधुदुर्ग आंबोली सैनिक स्कूलचा वर्धापन दिन

सावंतवाडी :

आंबोली येथील सिंधुदुर्ग सैनिक स्कूल ॲण्ड ज्युनियर कॉलेजचा २१ वा वर्धापन दिन २२ व २३ डिसेंबरला आयोजित केला आहे. रविवारी २२ डिसेंबरला सायंकाळी ६ वाजता विविध कलागुणांचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जाणार आहेत. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून ५८ एनसीसी बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल दयाळ उपस्थित राहणार आहेत. यावेली विविध स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांचा पारितोषिक देऊन गुणगौरव करण्यात येणार आहे. सोमवारी २३ डिसेंबरला सकाळी साडेदहा वाजता संचालन, लाठीकाठी, झांज, नृत्य, मल्लखांब, लेझीम, व्हॅली क्रॉसिंग अशी विविध मैदानी प्रात्यक्षिके सादर केली जाणार आहेत. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल उपस्थित राहणार आहेत. यानिमित्त शाळेच्या ‘वेध’ या वार्षिक अंकाचे प्रकाशन केले जाणार आहे. सर्व पालक व नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून छोट्या जवानांचे कौतुक करावे, असे आवाहन कार्यकारी अध्यक्ष सुनील राऊळ, प्रा. नितीन गावडे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा