निरोगी जीवनासाठी जीवनशैली बदला- श्री. शांताराम रावराणे
वैभववाडी
आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येक व्यक्ती कोणत्या तरी आरोग्य समस्येने त्रस्त आहे. उत्तम आणि निरोगी जीवनासाठी आपली जीवनशैली बदलली पाहिजे असे असे मत वैभववाडी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री. शांतारामकाका रावराणे यांनी व्यक्त केले.
माधवबाग शाखा कणकवली यांचे मोफत आरोग्य तपासणी शिबिर दत्त विद्यामंदिर वैभववाडी शाळा नंबर १ येथे मंगळवार दिनांक १७ डिसेंबर रोजी संपन्न झाले. या शिबिराचा उद्घाटन समारंभ प्रसंगी अध्यक्ष स्थानावरून रावराणे बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे वैभववाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. सुनील अवसरमोल वैभववाडी नगरपंचायतचे मुख्याधिकारी श्री.प्रतिक थोरात तसेच माधवबागच्या डॉ. पल्लवी पाटील, डॉ. सुविद्या टिकले, वैभववाडी तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष श्री.तेजस आंबेकर, रिक्षा चालक- मालक संघटनेचे प्रतिनिधी श्री.सचिन तळेकर, ग्राहक पंचायत महाराष्ट्र वैभववाडी तालुका शाखेचे अध्यक्ष तेजस साळुंखे, व्यापारी संघाचे उपाध्यक्ष अरविंद गाड, जिल्हा प्रतिनिधी संतोष कुडाळकर,शाळेचे मुख्याध्यापक दिनकर केळकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संजय शेळके आदी मान्यवर उपस्थित होते.
दिफ प्रजनन करून आरोग्य शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी प्रतिक थोरात यांनी वैभववाडीसाठी आयोजित केलेल्या मोफत आरोग्य शिबिराचे स्वागत करुन शुभेच्छा व्यक्त केल्या. सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.सुनील अवसरमोल यांनी अशा प्रकारचे शिबिर आजच्या काळात महत्त्वाचे असून सर्वांनी शिबिराचा लाभ घेतला पाहिजे. त्यांनी आयोजकांना धन्यवाद देऊन शुभेच्छा व्यक्त केल्या. डॉ.पल्लवी पाटील यांनी या शिबिराच्या माध्यमातून आरोग्य तपासणीची संधी मिळते. पुढील धोक्याची योग्य वेळी माहिती मिळाल्यास योग्य उपचार करुन त्यावर मात करता येते असे सांगितले.
या शिबिराचि ज्येष्ठ नागरिक संघाचे प्रतिनिधी, व्यापारी संघाचे प्रतिनिधी, पालक व बहूसंख्य नागरिकांनी आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेतला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन प्रा.एस.एन. पाटील यांनी केले तर आभार तेजस आंबेकर यांनी व्यक्त केले.
सदर शिबिराच्या यशस्वीतेसाठी वैभववाडी तालुका व्यापारी संघ, रिक्षा चालक-मालक संघटना वैभववाडी, ज्येष्ठ नागरिक संघ वैभववाडी, ग्राहक पंचायत महाराष्ट्र तालुका शाखा वैभववाडी आणि माधवबागच्या टीमने विशेष परिश्रम घेतले.