You are currently viewing जगणं माझं!पुस्तका इतकचं!

जगणं माझं!पुस्तका इतकचं!

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*जगणं माझं!पुस्तका इतकचं!*

 

लहानपणी फुटक्या पाटीवर

जितकं प्रेम केलं

तितकचं प्रेम हातातल्या

पुस्तकांवर मी करतो….

मी देवाची पूजा करत नाही

पण एक उदबत्ती

माझ्या पुस्तकांपुढे लावतो…!

 

बालपणी पांढरा खडू आवडीने

कां खायचो!आजही ठाऊक नाही

आजही तेवढ्याच आवडीने खातांना

पुस्तकं कां वाचतो!तेही ठाऊक नाही

 

आई आजीचा मार खात खात

संस्कार खडूचा मनावर गिरवला

काळ्या पाटीवरचा पांढरा खडू

पुस्तकांच्या पानात मी रिचवला

 

प्रेम,धैर्य,विश्वास !पुस्तकी ज्ञानाने

अनंत क्षितिजावर वाट करून दिली

सभ्यपणा,सौजन्य,ज्ञानाने नव्या दिशेने

व्यक्तीमत्वावर प्रकाशाची शाल पांघरली

 

तुमचीही कथा माझ्या सारखीच असेल

जरा त्या पांढ-या खडूला बघा आठवून

पुस्तकांची आख्खी लायब्ररी धावत येईल

पुन्हा एकदा!काळी फुटकी पाटी होवून

 

काळ्या पाटीवरचा गिरवणारा..!!!

पांढरा खडू आठवला की नाही…!

ओरडा!खायला मिळत नाही कां ? आईच्या माराने ! डोळ्यातील थेंबानं

पुस्तकाचं पान! भिजलं की नाही…!

खडू !पाटी !आई!आजी.हात धरून

गिरवत गिरवत..संस्कार..जगण्यावर

 

बाबा ठाकूर धन्यवाद

प्रतिक्रिया व्यक्त करा