*सावंतवाडीत २० डिसेंबर रोजी संत गाडगेबाबा पुण्यतिथी*
सावंतवाडी
सिंधुदुर्ग जिल्हा परीट समाज व सावंतवाडी तालुका परीट समाज यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडी येथे २० डिसेंबर वार शुक्रवार रोजी श्रीराम वाचन मंदिर हॉलमध्ये श्री. संत गाडगेबाबा पुण्यतिथी साजरी करण्यात येणार आहे.
यानिमित्त सकाळी ठीक ७ वाजता सावंतवाडी भाजीमंडईची साफसफाई करणे व आपापला परिसर साफ करणे, ९ वाजता श्री संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन आरती व प्रसाद वाटप, ११ वाजता ह.भ.प. विनायक आजगावकर यांचे कीर्तन त्यानंतर तीर्थ-प्रसाद, दुपारी ३ वाजता सावंतवाडी राणी जानकीबाई सुतिकागृह व कुटीर रुग्णालय येथे फळवाटप, ४ वाजता जिल्ह्यातील परीट बांधवांची बैठक व त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम व भजन इत्यादी कार्यक्रम होणार आहेत. तरी या कार्यक्रमाचा सर्व परीट बांधवांनी, सावंतवाडीतील नागरिकांनी व गाडगेबाबा यांच्या भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन परीट समाज जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर, जिल्हा सरचिटणीस संजय होडावडेकर, सावंतवाडी तालुकाध्यक्ष राजू भालेकर, तालुका सेक्रेटरी लक्ष्मण बांदेकर व तालुका खजिनदार जितेंद्र मोरजकर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी परीट समाज जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर मो. बा. ९४२२५८६११४ यांच्याशी संपर्क साधावा.