You are currently viewing जिल्ह्यात होणारी विषारी दारूची विक्री तात्काळ थांबवा – सुरेश सावंत

जिल्ह्यात होणारी विषारी दारूची विक्री तात्काळ थांबवा – सुरेश सावंत

जिल्ह्यात होणारी विषारी दारूची विक्री तात्काळ थांबवा – सुरेश सावंत

अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा…

सिंधुदुर्गनगरी

जिल्ह्यात गोवा बनावटीच्या विषारी दारूची विक्री मोठ्या प्रमाणात होत असल्याने तरुण पिढी बरबाद झाली आहे तर अनेक जर मृत्युमुखी पडले आहेत. तरी जिल्ह्यात होणारी विषारी दारूची विक्री तात्काळ थांबवावी. अन्यथा आपल्या कार्यालयासमोर आत्मदहन करणार, असा इशारा कणकवली पंचायत समिती माजी सभापती सुरेश सावंत यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गोवा बनावटीच्या विषारी दारूची विक्री होत असल्याबाबत यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधून ती तात्काळ बंद करा अशी मागणी केली होती. मात्र याची कोणतीही दखल न घेतल्यामुळे आज पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधत जिल्ह्यात विक्री होणारी विषारी दारू बंद न झाल्यास आपल्या कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा कणकवली पंचायत समिती माजी सभापती सुरेश सावंत यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन आज जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात आले. यावेळी महेंद्र सावंत, संदेश पटेल, सदा सावंत, अशोक कांबळे, बाळा मोरये, मंगेश बोभाटे, अनिल पांगम, दीपक सावंत आदी उपस्थित होते.

यावेळी दिलेल्या निवेदनातून त्यांनी संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये विक्री होणारी विषारी दारू बंद करावी, विषारी दारू पिऊन मृत पावलेल्या लोकांना प्रत्येकी दहा लाख रुपये द्यावे, विषारी दारू पिऊन आजारी पडलेल्यांना प्रत्येकी पाच लाख रुपये द्यावे, सिंधुदुर्गातील माध्यमिक शाळा कॉलेजच्या परिसरात सर्रास दारू, गांजा याची विक्री होते तरी प्रत्येक माध्यमिक शाळा व कॉलेजच्या ठिकाणी पोलिसांची ग्रस्त वाढवावी. विषारी दारू पिऊन मृत पावलेल्या लोकांच्या मुलांचे पालन पोषण, शिक्षण औषधोपचार याची जबाबदारी प्रशासनाने घ्यावी. जिल्ह्यातील काही किराणा मालाचे दुकान, पानपट्ट्या अशा ठिकाणी विषारी दारूची विक्री होत आहे ती तात्काळ थांबवावी. यासाठी जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाला तीस दिवसाची मुदत देत आहोत या कालावधीत जिल्हा प्रशासनाकडून कार्यवाही न झाल्यास त्यानंतर आपल्या कार्यालयासमोर आत्मदहन करण्यात येईल. असा इशारा सुरेश सावंत यांनी प्रशासनास दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा