*सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न*
वेंगुर्ले
सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मीडिअम स्कूल या शाळेच्या वार्षिक क्रीडा महोत्सवाचे आयोजन शुक्रवार दिनांक 13 डिसेंबरला करण्यात आले होते. वेंगुर्ला नगरपरिषदेच्या क्रीडांगणावर झालेल्या या महोत्सवाचे उद्घाटन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.मनीषा डिसोजा यांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित करून करण्यात आली.शाळेचे शिक्षक श्री.नितीन कुळकर्णी यांनी श्रीफळ वाढवून क्रीडा महोत्सवाचा शुभारंभ केला .शाळेचा क्रीडामंत्री कुमार मयूर बोवलेकर याने सर्व विद्यार्थ्यांना क्रीडा प्रतिज्ञा दिली. क्रीडा मंत्री कु.आदित्य नाईक आणि कु. मयूर बोवलेकर , शाळेचा लीडर कु.अनिश मालवणकर व सेक्रेटरी कु.दिया देवजी यांच्या नेतृत्वाखाली संचलन करण्यात आले होते. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मनीषा डिसोझा यांनी सर्व विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
क्रीडा महोत्सवात शाळेतील नर्सरी ते इ.दहावी पर्यंतचे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी सहभागी झाले होते .पारंपरिक क्रीडा प्रकारांचा देखील या क्रीडा महोत्सवामध्ये समावेश करण्यात आला होता. त्यानुसार क्रीडा महोत्सवात खो-खो ,कबड्डी, रीले,क्रिकेट , व्हॉलीबॉल, लंगडी ,लगोरी,रस्सीखेच असे सांघिक खेळ होते तसेच गोळा फेक,थाळीफेक,बॅडमिंटन, टेबल टेनिस ,धावणे अशा विविध वैयक्तिक खेळांचा समावेश करण्यात आला होता .सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने उत्साहाने क्रीडा महोत्सव जल्लोषात पार पाडला प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय हाऊस या संकल्पनेच्या आधारावर आपल्या संघाला जिंकून देण्याचा कसोशीने आणि प्रामाणिकपणे प्रयत्न केला .यशस्वी विद्यार्थ्यांना त्यांच्या क्रमांकानुसार सुवर्ण , रौप्य आणि कांस्यपदक व प्रमाणपत्र देऊन मुख्याध्यापिका सौ.मनिषा डिसोजा यांच्या हस्ते गौरविण्यात आले. संस्थेचे उपाध्यक्ष श्री. इर्शाद शेख, संचालक श्री .प्रशांत नेरुरकर व सेक्रेटरी श्री.दत्तात्रय परुळेकर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मनीषा डिसोजा यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा शिक्षक श्री. दिनेश जाधव ,श्री. गजानन पालयेकर, श्री. नितीन कुळकर्णी यांच्या सहकार्याने तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने क्रीडा महोत्सव उत्साहात पार पडला .यावेळी वेंगुर्ला तालुका क्रीडा अधिकारी, वेंगुर्ला नगरपरिषद ,क्रिकेट संघ प्रशिक्षक श्री.सुधीर सारंग यांचेही विशेष सहकार्य लाभले.