संविधान प्रतिमा विटंबना करणाऱ्या समाजकंटकावर कारवाई करा
वैभववाडी बौद्ध सेवा संघाचे तहसीलदार सूर्यकांत पाटील यांना निवेदन
वैभववाडी
परभणी येथे संविधान प्रतिमेची विटंबना करणाऱ्या समाजकंटकावर तसेच आंदोलकांवर लाटीचार्ज करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करावी. अशी मागणी वैभववाडी तालुका बौध्द सेवा संघाच्यावतीने करण्यात आली. याबाबत वैभववाडी तसीलदार यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथे 12 डिसेंबर 2024 रोजी भारतीय संविधानाचा अवमान करणारी घटना घडली आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळ असलेल्या संविधान प्रतिमेची येथील समाजकंटकांनी नासधूस करून अवमान करण्यात आला. त्यानंतर येथील जनतेने विशेषता बौद्ध जनतेने या निंदनीय घटनेचा निषेध करण्यासाठी आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान आंदोलकांवर पोलिसांकडून लाठी चार्ज करण्यात आला. संविधानाचा अवमान व बौद्ध जनतेला पोलिसांकडून मारहाण या दोन्ही घटनांचा या निवेदनाद्वारे आम्ही जाहीर निषेध करीत आहोत. आपण महाराष्ट्राचे मुख्य मुख्यमंत्री म्हणून नुकतीच शपथ घेतली आहे. त्यानंतर संविधान विरोधी घटना महाराष्ट्रात घडते ही बाब राष्ट्रीय हिताला लांच्छनास्पद व हानिकारक आहे. ज्या संविधानावर भारत देश चालत आहे. त्या संविधानाचा अशा प्रकारे अवमान करणे अत्यंत चुकीचे असून अशा देश विरोधी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी या घटनेतील दोषी समाजकंटकावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून कडक शिक्षा करण्यात यावी. तसेच आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर लाठी चार्ज करणाऱ्या पोलिसांना तात्काळ निलंबित करावे. अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा वैभववाडी तालुका बौद्ध सेवा संघ यांच्या वतीने देण्यात आला आहे. यावेळी सचिव रवींद्र पवार, सहसचिव शरद कांबळे, हरीश कांबळे , शिवाजी पवार,राजेंद्र पवार, सुरेश भोसले, गणेश भोसले,विजय यादव, प्रकाश यादव, तुकाराम पवार, दीक्षा कांबळे, मंगेश कांबळे आदी वैभववाडी तालुका बौद्ध सेवा संघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.