You are currently viewing भाजपा वेंगुर्ले कार्यालयात भारतरत्न , लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

भाजपा वेंगुर्ले कार्यालयात भारतरत्न , लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

*भाजपा वेंगुर्ले कार्यालयात भारतरत्न , लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन*

वेंगुर्ले

राष्ट्रीय एकता आणि अखंडतेचे प्रणेते , लोहपुरुष भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुण्यतिथीनिमित्त भाजपा वेंगुर्ले तालुका कार्यालयात प्रदेश का.का.सदस्य शरद चव्हाण यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले .
चाणक्यानंतर , भारताला एकसंध करण्यासाठी जर कोणी महापुरुषाने कोणतेही महत्वपूर्ण कार्य केले असेल तर ते सरदार वल्लभभाई पटेल होते . त्यामुळेच आज काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत आपण भारत मातेचे स्मरण एकाच स्वरात करतो . देशाचे अखंडत्व राखण्यात सरदार साहेबांचा मोठा वाटा होता . त्यांनी आपल्याला एकसंध भारत दिला , आता श्रेष्ठ भारत घडवणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आणि कर्तव्य आहे असा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना दिला आहे . एकसंध भारत श्रेष्ठ भारत होण्यासाठी आपण सर्वांनी सामुहिक प्रयत्न करुया असे प्रतिपादन शरद चव्हाण यांनी केले .
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई , तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , युवा मोर्चा प्रदेश सचिव मिहीर देसाई , ता. सरचिटणीस बाबली वायंगणकर , जि.का.का.सदस्य वसंत तांडेल व मनवेल फर्नांडिस ,सरपंच संघटनेचे पपु परब , ता.उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कर्पे , शक्तिकेंद्र प्रमुख – मयुरेश शिरोडकर , नाथा मडवळ – नितीन परब – कमलेश गावडे – जगंन्नाथ राणे , खरेदी विक्री संघ चेअरमन ज्ञानेश्वर केळजी , आसोली उपसरपंच संकेत धुरी , होडावडा उपसरपंच राजबा सावंत , अमित गावडे, राहुल गावडे , दाजी परब , नितीन चव्हाण , संजु प्रभु , सिद्धेश सावंत , संदिप देसाई , अनंत केळजी , ओंकार चव्हाण तसेच इतर अनेक भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते .

प्रतिक्रिया व्यक्त करा