प्रसिद्ध तबला वादक झाकीर हुसैन यांचं निधन झालं आहे. झाकीर हुसैन यांनी वयाच्या ७३ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. झाकीर हुसैन यांच्या निधनाने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. प्रसिद्ध तबला वादक झाकीर हुसैन यांची आज रविवारी संध्याकाळी अचानक तब्येत बिघडली. अमेरिकेतील रुग्णालयात झाकीर हुसैन यांच्यावर उपचार सुरु होते. झाकीर हुसैन यांना हृदयविकाराचा त्रास होता. त्यासाठी त्यांना अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण अखेरीस त्यांची झुंज अपयशी ठरली आणि झाकीर हुसैन यांची प्राणज्योत मालवली.