*लष्करी दलात नियुक्ती झालेल्या बबन कोकरे यांचा सत्कार*
फोंडाघाट
फोंडाघाट मधील बावीचा भाटले येथील युवक बबन कोकरे यांची लष्करी दलात नियुक्ती झाल्याबद्दल ‘युवा प्रतिष्ठान लोरे नं 1 ‘ यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम बावीचा भाटला जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत संपन्न झाला.
कार्यक्रमाला युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. चंद्रशेखर रावराणे यांच्या उपस्थितीने विशेष महत्त्व प्राप्त झाले. यावेळी श्री. दिलीप शेळके सर यांनी मान्यवरांचे स्वागत केले आणि कुमार बबन कोकरे यांनी घेतलेली मेहनत विद्यार्थ्यांसमोर व्यक्त केली. तसेच, श्री. मनोज गव्हाणकर हेही या कार्यक्रमात उपस्थित होते.
युवा प्रतिष्ठानचे सदस्य श्री. राजेश धुरी, श्री. संजय पेडणेकर,श्री. प्रीतम रावराणे, श्री शिंदे कार्यक्रमात हे उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान बबन कोकरे यांच्या देशसेवेसाठी घेतलेल्या या महत्त्वपूर्ण पावलाचे कौतुक करण्यात आले आणि उपस्थितांनी त्यांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
युवा प्रतिष्ठान लोरे नं. 1