नाशिक:-
येथील गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या तिसऱ्या अखिल भारतीय शेकोटी लोककला साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका प्रा.सुमती पवार यांची तर स्वागताध्यक्षपदी मविप्रचे सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.
मखमलाबाद रोडवरील भावबंधन मंगल कार्यालयात शुक्रवार दि.१० आणि शनिवार दि.११ जानेवारी, २०२५ या कालावधीत तिसरे अखिल भारतीय शेकोटी लोककला साहित्य संमेलन होणार असून यात गेल्या दोन संमेलनांप्रमाणे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.