You are currently viewing कुडाळ नगरपंचायतीमध्ये “स्वनिधी भी, स्वाभिमान भी” शिबिराचे आयोजन…

कुडाळ नगरपंचायतीमध्ये “स्वनिधी भी, स्वाभिमान भी” शिबिराचे आयोजन…

कुडाळ नगरपंचायतीमध्ये “स्वनिधी भी, स्वाभिमान भी” शिबिराचे आयोजन…

कुडाळ

नगरपंचायत येथे “स्वनिधी भी, स्वाभिमान भी” पंधरवड्याचे दि. १ ते १५ डिसेंबर २०२४ या दरम्यान आयोजन करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमांतर्गत बँकेकडून परत आलेले कर्ज प्रकरणे पडताळणी करून निकाली काढणे, बँकेकडे प्रलंबित कर्ज मंजूर प्रकरणे वितरित करणे, पथविक्रेत्यांची डिजिटल सक्रियता वाढविणे, रक्कम १० हजार,२० हजार व ५० हजार रुपयांचे कर्ज वाटप इत्यादी उपक्रम राबविले जातील.
त्याअनुषंगाने ५ डिसेंबरला कुडाळ नगरपंचायत कार्यालयात पथविक्रेते यांची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेमध्ये पथविक्रेत्यांनी डिजिटल व्यवहार कसा करावा? याबाबत मार्गदर्शन केले. तसेच सदर कर्ज प्रकरणाकरिता काढण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा, प्रधानमंत्री सुरक्षा विमा व प्रधानमंत्री जनधन बचत खाते विविध योजनांची पॉलिसीची माहिती पथविक्रेत्यांना दिली. या कार्यक्रमाचे उद्घाटन नगरपंचायत मुख्याधिकारी अरविंद नातू यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला असून सदर कार्यक्रमात राजू पठाण कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी, निलेश म्हाडेश्वर लिपिक कर व मिळकत विभाग, अतुल आडसूळ समुदाय संघटक, शैलेश नेवाळकर, वैष्णवी पेडणेकर आदींसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा