You are currently viewing टी. बी. मुक्त ग्रामपंचायत अभियान : जिल्ह्यातील ७० तर दोडामार्ग तालुक्यातील १७ ग्रामपंचायतचा गौरव

टी. बी. मुक्त ग्रामपंचायत अभियान : जिल्ह्यातील ७० तर दोडामार्ग तालुक्यातील १७ ग्रामपंचायतचा गौरव

टी. बी. मुक्त ग्रामपंचायत अभियान : जिल्ह्यातील ७० तर दोडामार्ग तालुक्यातील १७ ग्रामपंचायतचा गौरव

जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्याकडून झाला विशेष पुरस्कार देवून सत्कार*

सिंधुदुर्ग

शासनाने यावर्षीपासून टीबी मुक्त भारत ही संकल्पना राबवली आहे. टीबी सारख्या रोगाला देशातून हद्दपार करण्यासाठी पुढचे शंभर दिवस शासनाने घेतले असून यासाठी विविध उपाय योजना सुरू केले आहेत. त्यातच महाराष्ट्र शासनाने टीबी मुक्त ग्रामपंचायत हा नवीन पुरस्कार यावर्षीपासून सुरू केला असून ज्या ग्रामपंचायत या टीबी मुक्त आहेत यांचा सत्कार जिल्हा नियोजन सभागृहात जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. या जिल्ह्यातील एकूण ७० ग्रामपंचायत तर दोडामार्ग तालुक्यातील १७ ग्रामपंचायतचा समावेश आहे.

जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी दोडामार्ग तालुक्यातील सासोली ग्रामपंचायत (ग्रामपंचायत सदस्य गुरुदास दत्ताराम सावंत) पाटये पुनर्वसन (सरपंच प्रविण गवस), कुडासे ग्रामपंचायत (सरपंच सौ पुजा देसाई) मोरगांव ग्रामपंचायत (सरपंच संतोष आईर), कोलझर ग्रामपंचायत (सरपंच सुजल गवस) मणेरी ग्रामपंचायत (उपसरपंच विशाल मोहन परब),तळकट ग्रामपंचायत (सुरेंद्र सावंत), आडाळी ग्रामपंचायत (पराग गावकर) कळणे ग्रामपंचायत (अजित देसाई) घोटगे ग्रामपंचायत (भक्ती दळवी )खोक्रल ग्रामपंचायत (देवेंद्र शेटकर) मोर्ले ग्रामपंचायत (संजना धुमास्कर) पिकुळे ग्रामपंचायत (आपा गवस) तेरवण मेढे ग्रामपंचायत (सोनाली गवस) उसप ग्रामपंचायत (रुचिता गवस) विर्डी ग्रामपंचायत (सुशांत नाईक) माटने ग्रामपंचायत महादेव गवस या सर्व सरपंचांचा सत्कार केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा