You are currently viewing बांदा प्रभागस्तरीय क्रीडा महोत्सवाचे शानदार उद्घाटन

बांदा प्रभागस्तरीय क्रीडा महोत्सवाचे शानदार उद्घाटन

*बांदा प्रभागस्तरीय क्रीडा महोत्सवाचे शानदार उद्घाटन*

*बांदा*

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आयोजित बांदा प्रभागस्तरीय बाल कला क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सवाचे शानदार उद्घाटन संपन्न झाले.
बांदा सरपंच प्रियांका नाईक यांच्या अध्यक्षतेखाली खेमराज हायस्कूलच्या मैदानावर संपन्न झालेल्या या महोत्सवाचे उद्घाटन बांदा पोलिस निरीक्षक बडवे यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन झाले. या महोत्सवात बांदा प्रभागातील बांदा, इन्सुली,शेर्ले,तांबुळी,नेतर्डे या पाच केंद्रातील शाळा सहभागी झाल्या होत्या.या उद्घाटन सोहळ्याला माजी जिल्हा परिषद सदस्या श्वेता कोरगावकर विस्तार अधिकारी लक्ष्मीदास ठाकूर,बांदा शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रत्नाकर आगलावे, उपाध्यक्षा संपदा सिध्दये, ग्रामपंचायत सदस्या रूपाली शिरसाट, सदस्य हेमंत मोर्ये,विलवडे सरपंच प्रकाश दळवी निगुडे सरपंच लक्ष्मण निरगुडकर, केंद्र प्रमुख नरेंद्र सावंत , केंद्र मुख्याध्यापक शांताराम असनकर, प्रभागातील सरपंच, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विस्तार अधिकारी लक्ष्मीकांत ठाकूर यांनी केले‌ सुत्रसंचालन गौरवी पेडणेकर तर आभार नारायण नाईक यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा