You are currently viewing खुनाचे आरोपातून आरोपिंची निर्दोष मुक्तता

खुनाचे आरोपातून आरोपिंची निर्दोष मुक्तता

कुडाळ मासळी मार्केट येथील खुनाचे आरोपातून आरोपिंची निर्दोष मुक्तता

माणगांव / प्रतिनिधी :-

तळगाव येथील निवृत्त वायरमन विजय सावंत यांचा खून दिनांक २८/०८/२०१८ रोजी दुपारी १ वाजून १० कुडाळ मासळी मार्केट येथील आनंद दिगंबर साळगावकर यांचे दुकान गाळ्यात भाड्याने राहत असलेली सुनीता पुंडलिक राठोड व आनंद साळगावकर यांनी डोक्यात लोखंडी रॉड मारून खून करून सदरचे प्रेत रात्रौ २.०० वाजता भंगसाळ नदी पात्रात टाकुन पुरावा नष्ट केल्याची फिर्याद अमोल नंदकुमार साळुंखे सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे निवती यांनी दिनांक ०४/०९/२०१८ रोजी दिलेली होती. आरोपी क्रमांक २ सुनीता पुंडलिक राठोड हिला कर्नाटक येथून ताब्यात घेऊन सदरचा गुन्हा कुडाळ पोलिस ठाण्याचे हद्दीत घडलेला असल्याने कुडाळ पोलीस ठाणे यांचेकडे सोपवला.

सदर गुन्हयाचे तपास काम पोलीस निरीक्षक जगदीश काकडे यांनी केले व भा.द.वी कलम ३०२,३०१ खाली दोषारोपपत्र सादर केले .सदर केसची सुनावणी प्रधान जिल्हा सत्र न्यायाधीश यांचे कोर्टात होऊन सरकार पक्ष आरोप सिद्ध न करू शकल्याने न्यायालयाने आरोपींची निर्दोष मुक्तता केली.आरोपी नंबर १ तर्फे ऍड.एस डी देसाई आणि आरोपी नंबर २ तर्फे ऍड संदेश राणे यांनी काम पाहिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

12 − 6 =