You are currently viewing देवगड हडपिड स्वामी समर्थ मठ येथे दत्तजयंती उत्सव

देवगड हडपिड स्वामी समर्थ मठ येथे दत्तजयंती उत्सव

देवगड :

श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई संचलित श्री स्वामी समर्थ मठ हडपिड देवगड येथे दत्त जयंती निमित्त १३ ते १४ डिसेंबर या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

१३ रोजी सकाळी ९ ते १ या वेळेत रक्तदान शिबीर व देवगड फाउंडेशन डॉ आठवले कॅम्पस द्वारा नेत्र तपासणी शिबीर होणार आहे. १४ डिसेंबर रोजी दत्तजयंती उत्सव होणार आहे. सकाळी ७ ते ९ गणेश पूजन, पादुका पूजन, पुण्यवाचन, होमहवन, सकाळी ९ ते ११ लघुरुद्र, कुंकूमार्चन, सकाळी ११ ते १२ पालखी सोहळा, १२ ते १२:३० आरती, दुपारी १ ते ३ महाप्रसाद, दुपारी ३ ते ४ अक्कलकोट दर्शन यात्रा भाग्यवंत लॉटरी सोडत, सायंकाळी ४ ते ५ नामस्मरण, सायंकाळी ५:३० वा. महापुरुष वारकरी भजन मंडळ कासार्डे यांचे भजन होणार आहे. उपस्थितीचे आवाहन श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी – मुंबई, श्री स्वामी समर्थ मठ हडपिड कार्यकारी मंडळ आणि गाव समिती यांच्या वतीने ट्रस्ट अध्यक्ष प्रभाकर राणे, सचिव नंदकुमार पेडणेकर, खजिनदार ज्ञानेश्वर राऊत यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा