You are currently viewing मी कशाला जन्मलो?- चुकलेच माझे

मी कशाला जन्मलो?- चुकलेच माझे

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री भारती महाजन राय बागकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

मी कशाला जन्मलो?- चुकलेच माझे

ह्या जगाशी भांडलो – चुकलेच माझे

 

मान्यही केलेस तू, आरोप सारे

मीच तेव्हा लाजलो! – चुकलेच माझे

 

गझलकार-सुरेश भट…

 

धार्ष्ट्य करून पुढील स्वरचित काव्यपंक्ती सादर…

________________________

 

कबुलीजबाब

 

वन्ही जळतो वेदनांचा, हृदयांतरी

आतूनी पेटून उठलो – चुकलेच माझे

 

काय होते जाहले, कळलेच नाही

तरीही संतापलो – चुकलेच माझे

 

दोष दुज्याला दिला, इतरांप्रमाणे

मी वहावत गेलो – चुकलेच माझे

 

जग होते बरोबर, आपल्याच ठायी

मी ऊशीरा समजलो – चुकलेच माझे

 

मार्ग कोणी दाविता का, मजशी कोणी

हरेकास मी पुसत गेलो – चुकलेच माझे

 

क्षमायाचनेची निघून गेली, वेळ आता

हात मी जोडीत गेलो – चुकलेच माझे

 

@भारती महाजन-रायबागकर

चेन्नई

©® ह्या कवितेचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा