*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*शाळा सुटली तरी*
शाळा सुटून
बरीच वर्षे झाली
स्मरणात राहिली
कायम….
रमत गमत
दप्तर घेत पाठीवर
शाई दौतभर
सांभाळून…
बसायला तरटपट्टी
पाटी लेखन हाती
पुस्तक बालभारती
सुंदर….
कविता पाढे
मोठ्याने सारे म्हणत
रमत गमत
घरी….
सगळ्या मैत्रिणी
डब्यातील जेवण मिळून
संत्रा गोळी खाऊन
तृप्त…..
पितळी घंटा
जोरात जेव्हा वाजायची
सुट्टी व्हायची
शाळेला….
आताही आठवतात
दिवस ते सुंदर
आठवणींचे पदर
उलगडतात….
शिस्त वळण
मिळाले तिथे समाजभान
जीवन प्रकाशमान
मुल्यशिक्षणाने…..
~~~~~~~~~~~~~
अरुणा दुद्दलवार @✍️