*मानवी हक्काबरोबर कर्तव्याची पण जाणीव हवी*- ॲड. नकुल पार्सेकर
मानवी हक्क न्यायशास्त्राचे जनक न्यायमूर्ती भगवती यांनी न्यायिक सक्रीयतेद्वारे उपजिवीका, निवारा, आरोग्य व पाणी हे मुलभूत हक्क अबाधित रहावे म्हणून विशेष प्रयत्न केले.
मानवी हक्क हे आपल्याला भारतीय घटननेने दिलेले हक्क आहेत ते कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. राष्ट्रयत्व, लिंग, रंग, धर्म, जात, भाषा किंवा इतर कोणत्याही स्थितीची पर्वा न करता हे सार्वजनिक हक्क आहेत. मात्र या संविधानाकी मानवी हक्कासोबत प्रत्येक भारतीय नागरिकांनी आपल्या कर्तव्याचीही जाणीव ठेवून आपण तसे आचरण केले पाहिजे असे प्रतिपादन अटल प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅड. नकुल पार्सेकर यांनी केले.भारतीय मानवी हक्क दिनाचे औचित्य साधून लक्ष्मीबाई सिताराम हळवे महाविद्यालय दोडामार्गच्या राष्ट्रीय सेवा योजना व अटल प्रतिष्ठान संचलित महिला समुपदेशन केंद्र सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या कार्यशाळेत ते बोलत होते.
संविधानाच्या भाग तीनमध्ये समाविष्ट असलेल्या कलम बारा ते पस्तीस मध्ये मुलभूत अधिकारांचा समावेश असून मानवी हक्क पण त्यात अंतर्भूत केलेले आहेत.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष सावंत यांनी कार्यक्रमाच्या आयोजना बाबतची भूमिका स्पष्ट केली.
महिला अत्याचार, वाढती गुन्हेगारी आणि कौटुंबिक हिंसाचार यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून फक्त सरकारी यंत्रणावर अवलंबून न रहाता समाजातील प्रत्येक जागृत नागरिकांनी एकत्र येऊन याबाबत प्रबोधन करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन महिला समुपदेशन केंद्राच्या समुपदेशक अर्पिता वाटवे यांनी केल.
कार्यक्रमाला उपस्थित असलेले विशेष अतिथी व दानशूर उद्योजक श्री विवेकानंद नाईक यांनी अशा कार्यक्रमातून आजच्या तरुण तरुणींचे प्रबोधन करण्यासाठी असे कार्यक्रम सातत्याने आयोजित करण्याची गरज असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कु. सानिया गंवडळकर यांनी केलं तर आभार प्रदर्शन कु. दिव्या देसाई हिने केल.
कार्यक्रमाला राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रा. हेमंत पेडणेकर,प्राध्यापक वर्ग व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.
*फोटो कॅप्शन- संबोधित करताना अॅड नकुल पार्सेकर व्यासपीठावर प्राचार्य डॉ. सावंत, उद्योजक श्री विवेकानंद नाईक, समुपदेशक श्रीमती वाटवे व इतर*