You are currently viewing निराधार वृद्ध आजारी अवस्थेत रस्त्यावर तळमळताना पाहून सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी हॉस्पिटलमध्ये केली दाखल.

निराधार वृद्ध आजारी अवस्थेत रस्त्यावर तळमळताना पाहून सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी हॉस्पिटलमध्ये केली दाखल.

निराधार वृद्ध आजारी अवस्थेत रस्त्यावर तळमळताना पाहून सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी हॉस्पिटलमध्ये केली दाखल.

कुडाळ घावनाळे येथील तुकाराम म्हापणकर वय वर्ष 72 हा निराधार वृद्ध काल रात्री नऊच्या दरम्याने जिमखाना परिसरामध्ये आजारी अवस्थेत तळमळत असताना पाहून सामाजिक बांधिलकीचे कार्यकर्ते रवी जाधव व सुजय सावंत यांनी त्या निराधार वृद्धाकडे धाव घेतली व सर्वप्रथम या घटनेची कल्पना सावंतवाडी पोलीस स्टेशनचे बीट हवालदार पि.के कदम यांना देऊन सदर निराधार रुग्णाला ॲम्बुलन्स द्वारे सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये ऍडमिट केले त्या निराधार रुग्णावर उपचार सुरू आहेत.
सदर निराधार वृद्ध हा घावनळे येथील रहिवाशी असून गेल्या दोन दिवसाच्या पावसामध्ये चिंब भिजला होता व पोटातही अन्नाचा कण नव्हता. काल सकाळी ताप येऊन त्याला ओमीटिंग होत होतं त्यामुळे तो निराधार वृद्ध सारखा रस्त्यावर तळमळत होता हे पाहून सामाजिक बांधिलकीच्या कार्यकर्त्यांनी त्याला त्वरित हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं सदर उद्याच्या वृद्धाच्या नातेवाईकांशी संपर्क होऊ शकला नाही.
तरी सदर वृद्ध व्यक्तीची ओळख पटल्यास सामाजिक बांधिलकीचे कार्यकर्ते रवी जाधव यांच्याशी संपर्क साधावा. 9405264027

प्रतिक्रिया व्यक्त करा