सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचा जळगाव येथील एका वृद्ध महिलेला आधार.
सावंतवाडी
कामाच्या शोधात जळगाव वरून आलेली वृद्ध महिला व तिचा मुलगा गेले तीन दिवस सावंतवाडी बस स्टैंडवरच राहत होते.
आज दुपारी एकच्या सुमारास त्या वृद्ध महिलेचा मुलगा तिला बस स्टैंड वर सोडून गेला त्यावेळी सदर वृद्ध महिला आपल्या मुलाला हाका मारून रडत होती.
तर त्या दोन जड बॅगा घेऊन ती रस्ता रडत रडत मुलाला शोधण्यासाठी फिरत असताना सामाजिक बांधिलकीचे कार्यकर्ते रवी जाधव यांनी पाहिले व सदर वृद्ध महिलेजवळ जाऊन तिची विचारपूस करून सर्व माहिती घेतली व तिच्या हातातील दोन्ही बॅगा घेऊन तिला बस स्टॅन्ड वर सावलीत बसवलं व लगेचच सावंतवाडी पोलीस बीड हवालदार पि.के कदम यांना याची कल्पना दिली असता त्यांनी लगेच पोलीस स्टेशन वरून पोलीस बीट हवालदार महेश जाधव यांना पाठवलं. तोपर्यंत तिचा मुलगा एक तासानंतर तेथे आला पोलिसांनी त्याच्याकडून सर्व माहिती घेऊन त्यांना लगेचच त्यांच्या गावी पाठवण्याची व्यवस्था केली.