You are currently viewing शिरशिंगे येथील शिवसेनाच्या ग्रा.पं. सदस्या सौ. निकम यांचा भाजपमध्ये प्रवेश..

शिरशिंगे येथील शिवसेनाच्या ग्रा.पं. सदस्या सौ. निकम यांचा भाजपमध्ये प्रवेश..

भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला प्रवेश..

सावंतवाडी :

तालुक्यातील शिरशिंगे येथील ग्रामपंचायत सदस्या सौ.रुपाली निकम, ग्रामस्थ जानू राऊळ, गजानन राऊळ, यशवंत राऊळ, रमेश राऊळ, गंगाराम राऊळ, महादेव धोंड, कृष्णा धोंड, यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत आज भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.
यावेळी सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब, आंबोली मंडल तालुका अध्यक्ष संदीप गावडे, जि. प. सदस्य पंढरीभाई राऊळ, प. स. रविंद्र मडगावकर, सरपंच सौ. रेखा घावरे, ग्रा. पं. सदस्य संदीप राऊळ, शिरशिंगे गाव बूथ अध्यक्ष नारायण राऊळ, सुनिल राऊळ, बूथ अध्यक्ष अमित राऊळ, फोटो राऊळ, संदेश बिडये, कृष्णा सावंत, कविटकर, वामन नार्वेकर तसेच शिरशिंगे भाजपा कार्यकर्ते, आणि शिरशिंगे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यांच्या प्रवेशामुळे शिरशिंगे येथे शिवसेनेला मोठा खिंडार पडला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

14 + 3 =