You are currently viewing माहेरचे बालपण

माहेरचे बालपण

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*माहेरचे बालपण*

 

माहेरी असतांनाच

दुडदुडतं ते बालपण

सावरायला सारेजण

असतात….

 

शाळेतून येताच

धूम ठोकायची खेळायला

मैत्रिणी सोबतीला

गराडा..‌.

 

जायचं सुटीत

बैलगाडीत बसून आजोळी

भरली झोळी

आठवणींनी.‌‌..‌

 

हिरव्यागार शेतात

कै-या, बोरं,चिंचा

आवळे,रानमेव्याचा

सुकाळ….

 

खळाळत्या नदीवर

वेचायचे खडे शिंपले

जपून आपापले

ठेवायचे..‌‌

 

भूक लागताच

गरमागरम पोळी ताटात

आईच्या हातात

जादू…..

 

खेळण्यासोबत शिस्त

मोठ्यांचा असायचा दरारा

डोळ्यांचा पहारा

असायचा….

 

जबाबदारी विना

माहेरचा बालपण सुंदर

गाणी पाळण्यावर

गायची…‌

 

रात्री गच्चीवर

चंद्र चांदण्या बघत

निद्रेची सोबत

गाढ…‌.

 

यावं परतून

माहेरचा सुंदर बालपण

पुन्हा आठवण

नव्याने……!!

 

§§§§§§§§§§§§§§§

 

अरुणा दुद्दलवार @✍️

प्रतिक्रिया व्यक्त करा