You are currently viewing माडखोल येथील ज्येष्ठाची ऑनलाईन फसवणूक

माडखोल येथील ज्येष्ठाची ऑनलाईन फसवणूक

माडखोल येथील ज्येष्ठाची ऑनलाईन फसवणूक

लाखाचा गंडा: अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल*

सावंतवाडी

मुलाचा अपघात झाल्याने उपचारासाठी पैशांची गरज आहे, असे मोबाईलवर सांगत माडखोल येथील एका ज्येष्ठाची एक लाखाची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.या प्रकाराबाबत संबंधिताने तात्काळ सायबर सेलकडे तक्रार दाखल केली असून याप्रकरणी अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार १५ दिवसांपूर्वी घडला होता.
आपल्या मोबाईलवर आलेल्या कॉलवरील आवाज हा मुंबईत आपण दहा वर्षांपूर्वी कामावर असलेल्या ओळखीच्या राजस्थान येथील शर्मा नामक व्यक्तीसारखाच असल्याने आपण गुगल पे नंबरवरून एक लाख रुपये ट्रान्सफर केले,असे फसवणूक झालेल्या माडखोल येथील ज्येष्ठ व्यक्तीने सांगितले.दहा वर्षांपूर्वी शर्मा नामक मित्राचा मोबाईल नंबर आपल्याकडे नव्हता.त्यावेळी त्याचे वय ६० होते.मी गावी आल्यानंतर त्याचा आणि माझा कधीच संपर्क झाला नाही.मात्र, त्याच्यासारखाचा आवाज असल्याने आपण एक लाख रुपये ऑनलाईन ट्रान्सफर केले. मात्र, फसवणूक लक्षात येताच तात्काळ ओरोस पोलीस मुख्यालयात जाऊन सायबर सेलकडे तक्रार केली तसेच सावंतवाडी पोलीस ठाण्यातही शर्मा नामक व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा