You are currently viewing भजन कलाकारांची ८ डिसेंबर ला होणार बैठक

भजन कलाकारांची ८ डिसेंबर ला होणार बैठक

भजन कलाकारांची ८ डिसेंबर ला होणार बैठक

अखिल भजन सांप्रदाय हितवर्धक मंडळ महाराष्ट्र राज्याचे पदाधिकारी राहणार उपस्थित

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व भजन कलाकारांनी उपस्थित राहावे

कलाकार मानधन समिती अध्यक्ष संतोष कानडे यांचे आवाहन

कणकवली :

भजन, परंपरा जतन, विकास आणि समस्त भजन कलाकारांच्या उज्वल भवितव्यासाठी आपली वज्रमूठ आवश्यक आहे. यासाठी सर्व भजन कलाकारांनी संघटित होण्याची गरज आहे. हि बाब लक्षात घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व भजन कलाकारांनी यामध्ये प्रामुख्याने बुवा, वादक, आणि कोरस यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. रविवार दिनांक ८ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता कणकवली शहरातील मातोश्री हॉल येथे ही बैठक होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जेष्ठ कलाकारांसहित अखिल भजन सांप्रदाय हितवर्धक मंडळ महाराष्ट्र राज्याचे पदाधिकारी या बैठकीस उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व भजन कलाकारांची उपस्थिती प्रार्थनीय आहे, असे आवाहन कलाकार मानधन समितीचे अध्यक्ष बुवा संतोष कानडे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा