देवगड येथे ७ तारखेला तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेचे आयोजन…
देवगड
दिक्षित फाऊंडेशन व अनंत कृष्ण केळकर हायस्कूल वाडा यांच्या संयुक्त विद्यमाने ७ डिसेंबरला तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा वाडा हायस्कूलच्या निळकंठ श्रीधर तथा बाळासाहेब दीक्षित क्रीडांगणावर सकाळी ८.३० ते संध्याकाळी ६.०० या वेळेत होणार आहे.
दीक्षित फाउंडेशनच्या भरीव देणगीतून नूतनीकृत होत असलेल्या या मैदानावर पहिलीच भव्य तालुकास्तरीय खो-खो स्पर्धा आयोजित केलेली आहे. या स्पर्धेसाठी देवगड तालुक्यातील विविध शाळा सहभागी होणार असून इयत्ता दहावी पर्यंतच्या मुलगे व मुली अशा दोन गटांमध्ये ही स्पर्धा होणार आहे. दीक्षित फाउंडेशन पुरस्कृत या स्पर्धेप्रमाणे यापुढेही असे विविध उपक्रम दीक्षित फाऊंडेशन मार्फत राबवण्यात येणार असल्याचे निरंजन दीक्षित यांनी सांगितले. या स्पर्धेसाठी सर्व क्रीडाप्रेमींनी, ग्रामस्थांनी तसेच शिक्षण प्रेमींनी उपस्थित रहावे असे आवाहन शाळेकडून करण्यात येत आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.