*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी गीतकार गायक संगीतकार अरूण गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*
*”उद्यान”*
मनुष्य निर्मित रचना असे उद्यान
ईश्वराचे आशीर्वादाने आनंदवनIIधृII
सुसंवाद करतात वृक्ष फुले पान
कळ्यांचे श्वास फुलांचे विश्वास जाणं
उद्यानी बनते संवेदनशील मनII1II
अबोलीची कधी कधी चालते भुणभुण
साधू सारखा जास्वंद लावितोच ध्यान
आनंद आल्हाद देई रंगांचे आकर्षण II2II
शेवंती गुलाब राही कुज बुज करून
जाई केवडा अडवतात भारावून
मोगरा ऐटीत राहे दरवळे सुगंधII3II
आंबा राजाला आंबट कैऱ्या गोड छान
चिकू वैरागी सांभाळी बंधुभाव नातं
शेगट शेंगा धरून असे स्थितप्रज्ञII4II
वृक्षवेली लावती हजेरी ऋतुप्रमाणं
आस्वाद घ्यावा निसर्ग देई भरभरून
मनुष्य पशुपक्षी घेती मोद स्वच्छंद II5II
श्री अरुण गांगल कर्जत रायगड महाराष्ट्र.
पिन.410201.Cell9373811677.