You are currently viewing लोकशाहीर अण्णाभाऊ साठे उत्कृष्ठ साहित्य रत्न पुरस्कार कवी, मनोहर पवार यांना जाहीर .

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे उत्कृष्ठ साहित्य रत्न पुरस्कार कवी, मनोहर पवार यांना जाहीर .

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे उत्कृष्ठ साहित्य रत्न पुरस्कार कवी, मनोहर पवार यांना जाहीर .
————————–
चिखली ) येथिल रहिवासी शाहीर कवी, लेखक, मनोहर पवार यांना यंदाचा उत्कृष्ट साहित्या करीता राज्यस्तरीय लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्यरत्न पुरस्कार निवड समितीचे मुख्य संयोजक सचिन खंदारे यांनी केली असून स्व . मधुकर खंदारे स्मृतीप्रित्यर्थ आणि दे . भारत संग्राम आयोजित सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने व समाज भूषण अर्जुन गवई यांच्या वाढदिवसाच्या पर्वणीवर सदर राज्यस्तरीय पुरस्काराचे आयोजन करण्यात आले असून विविध क्षेत्रात विशेष कार्य करणारे व्यक्ती यांना राज्यस्तरीय पुरस्कारने मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे .
कवी, शाहीर मनोहर पवार केळवदकर यांनी साहित्य शाहीरी कला काव्य क्षेत्रात मोलाचे योगदान दिले असून महाराष्ट्रभर त्यांचे कार्य सुरु आहे . तसेच त्यांना शासनाचे संस्थांचे विविध पुरस्कार प्राप्त झाले असून त्यांचे कार्य अविरत सुरु असून सामाजिक कार्य, साहित्यिक चळवळ, तसेच कलाक्षेत्रात त्यांनी विविध जिल्हयात सहभाग नोंदविला असून ते विविध सामाजिक संघटन, पदाधिकारी आहेत . कवी मनोहर पवार यांनीअनेक काव्य, पोवाडे, अभंग, लावणी, शाहीरी फटके आदी काव्यप्रकार लिहीले असून ते विविध प्रसार माध्यमात सातत्याने लिखाण करीत असून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात घूमान, पंजाब प्रांतात सहभाग नोंदविला आहे . तसेच चित्रपट नाट्य अभिनय करीत चित्रपट महामंडाळाचे सदस्य असून शासनाचे मानधन प्राप्त शाहीर कलावंत आहेत .

प्रतिक्रिया व्यक्त करा