जिल्हा पोलिस प्रशासनाच्यावतीने ५ व ६ ला जिल्ह्यात सायबर फसवणूक नशामुक्ती जनजागृती अभियान…
सिंधुदुर्गनगरी
जिल्हा पोलिस प्रशासनाच्यावतीने ५ व ६ डिसेंबरला जिल्हाभरात सायबर फसवणूक, नशा मुक्ती डायल १२२ याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व पोलिस कर्मचारी व अधिकारी आपापल्या कार्यक्षेत्रात ही मोहीम राबविणार आहेत. त्यामुळे या मोहिमेत विद्यार्थी, पालक, शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि पर्यटकांनी सहभाग दर्शवावा, असे आवाहन पोलिस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे.