आयनोडे-हेवाळेत ८० टक्के मतदान
दोडामार्ग
दोडामार्ग तालुक्यातील ३ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान झाले. यात तेरवण-मेढे ६६.४२ टक्के , आयनोडे-हेवाळे येथे ८०.३९ टक्के व कुडासे येथे ६४.८० टक्के असे एकूण ६८.३१ टक्के इतके मतदान झाले. हे मतदान सर्वत्र शांततेत व सुरळीत पार पडले.
कुडासेत शिवसेना व भाजप पुरस्कृत पॅनल आमने सामने ठाकले होते. तेरवण -मेढे मध्ये शिवसेना विरुद्ध ग्रामविकास व आयनोडे – हेवाळे मध्ये महाविकास विरुद्ध ग्रामविकास अशी लढत होती. गेले काही दिवस या तिन्ही ठिकाणी परस्पर विरोधी पॅनलचे पदाधिकारी , कार्यकर्ते जोमाने प्रचार करत होते. प्रत्येक उमेदवार व पॅनेलने आपण गावासाठी काय काय विकास कामे करणार त्याचा लेखा- जोखा मतदारांकडे मांडला होता.
सार्वत्रिक ग्रा.पं. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील तीन ग्रा.पं. मध्ये सकाळी ७:३० पासून एकूण आठ मतदान केंद्रावर मतदान झाले. हे मतदान शांततेत पार पाडण्यासाठी यासाठी सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. निवडणूक अधिकारी, कर्मचारी कार्यरत होते. शुक्रवारी सायंकाळी उशिरा प्राप्त माहितीनुसार तेरवण -मेढे मध्ये एकूण ७९५ यात पुरुष ३९५ तर स्त्रिया ४००, आयनोडे – हेवाळे एकूण ४९६ यात पुरुष २७५ तर स्त्रिया २२१, कुडासे ९५९ यात पुरुष ५१० तर स्त्रिया ४४९ एवढे मतदान झाले. दोडामार्ग तालुक्यातील ३ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान झाले. यात तेरवण-मेढे ६६.४२ टक्के , आयनोडे-हेवाळे येथे ८०.३९ टक्के व कुडासे येथे ६४.८० टक्के असे एकूण ६८.३१ टक्के इतके मतदान झाले. हे मतदान सर्वत्र शांततेत व सुरळीत पार पडले.
कुडासेत शिवसेना व भाजप पुरस्कृत पॅनल आमने सामने ठाकले होते. तेरवण -मेढे मध्ये शिवसेना विरुद्ध ग्रामविकास व आयनोडे – हेवाळे मध्ये महाविकास विरुद्ध ग्रामविकास अशी लढत होती. गेले काही दिवस या तिन्ही ठिकाणी परस्पर विरोधी पॅनलचे पदाधिकारी , कार्यकर्ते जोमाने प्रचार करत होते. प्रत्येक उमेदवार व पॅनेलने आपण गावासाठी काय काय विकास कामे करणार त्याचा लेखा- जोखा मतदारांकडे मांडला होता. सार्वत्रिक ग्रा.पं. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील तीन ग्रा.पं. मध्ये सकाळी ७:३० पासून एकूण आठ मतदान केंद्रावर मतदान झाले. हे मतदान शांततेत पार पाडण्यासाठी यासाठी सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. निवडणूक अधिकारी, कर्मचारी कार्यरत होते. शुक्रवारी सायंकाळी उशिरा प्राप्त माहितीनुसार तेरवण -मेढे मध्ये एकूण ७९५ यात पुरुष ३९५ तर स्त्रिया ४००, आयनोडे – हेवाळे एकूण ४९६ यात पुरुष २७५ तर स्त्रिया २२१, कुडासे ९५९ यात पुरुष ५१० तर स्त्रिया ४४९ एवढे मतदान झाले.