*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री शीला पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*
*बहिणाबाई स्मृतिदिन*
माझी माय बहिणाई
खानदेशाची थोर कन्या
महती तिची गायी
आज सारी दुनिया
माझी माय बहिणाबाई
भाषा तिची अहिराणी
शब्द शब्दात गुंफुन
गाई रानामध्ये गाणी
विद्वत्तेची असे खाण
मायबोलीचा अभिमान
शारदेची तीजवर कृपा
महाराष्ट्राची स्वाभिमान
अरे संसार संसार
तिने कसा रे जपला
पितृछाया हरपता
बाळ पदराखाली झाकला
हाती बसता चटका
आयुष्याचे सांगे सार
ओवी अभंग रचता
जीवनाची कष्टी पार
रानपाखरे असती
तिच्या अवतीभवती
झाडाझुडपात सारे
पक्षी तिचेच सोबती
हिरवा गार दिसे मळा
आनंद मनात भरे
बहिणाबाईचे गीते
गाता गाता दिसं सरे
*शीला पाटील नाशिक.*