इन्सुली येथे ओहोळातील पाण्यात बुडून तरुणाचा मृत्यू…
बांदा
इन्सुली-सावंतटेंब येथील रामचंद्र गजानन राणे (४४) या तरुणाचा ओहोळातील पाण्यात बुडून मृत्यू झाला. याबाबतची फिर्याद त्याचे काका प्रदीप आत्माराम राणे यांनी बांदा पोलिसात दिली. प्राथमिक माहितीनुसार तो पाय घसरून ओहोळात पाण्यात पडला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. स्थानिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आला आहे. बांदा पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.