दोडामार्गात उपमा गावडे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ रुग्णसेवा केंद्राचे लोकार्पण…
भारत माता की जय संघाचा पुढाकार; उपस्थित मान्यवरांकडून उपक्रमाला शुभेच्छा…
दोडामार्ग
सामाजिक कामात नेहमी अग्रेसर असलेल्या कै. उपमा गावडे यांच्या प्रथम पुण्य दिनाच्या निमित्ताने दोडामार्ग येथे रुग्णसेवा केंद्र सुरू करण्यात आले. भारत माता की जय संघाच्या वतीने
या केंद्राचा उद्घाटन सोहळा आज पणजी-गोवा येथील आयुर्वेदिक तज्ञ डॉक्टर कृष्णनाथ संझगिरी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी भारत माता की जय संघाचे संस्थापक सुभाष वेलिंगकर गणेश गावडे उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांच्या माध्यमातून कै. सौ गावडे यांच्या जीवनावर प्रकाशझोत टाकणाऱ्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी सौ. गावडे यांच्या आठवणींना उजाळा दिला. या कार्यक्रमात पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी,नंदकिशोर दळवी, सोनू गवस, द्वारकादास सावंत, आत्माराम गावकर, शैलेश भोसले, शुभांगी गावडे, संजय देसाई, विनिता देसाई, गणेश गावडे, कैलास नाईक आदी पदाधिकारी उपस्थित होते.