*खांबाळे गेळये ते दार्यें धनगरवाडी रस्ता काम भाजप नेते आमदार नितेशजी राणे साहेब यांच्या माध्यमातून सुरू.*
*भाजप भटके विमुक्त आघाडी जिल्हा अध्यक्ष धनगर समाज युवा नेते आदरणीय नवलराज काळे साहेब यांच्या प्रयत्नांना यश*
*भाजप नेते जिल्हा बँक संचालक माजी वित्त व बांधकाम सभापती दिलीप रावराणे, खांबाळे गावचे माजी सरपंच मंगेश कदम, उमेश पवार, यांच्यासहित भारतीय जनता पार्टी खांबाळेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे विशेष सहकार्य*
*वैभववाडी-*
खांबाळे दार्ये धनगरवाडी अनेक वर्ष रस्त्या होणे साठी श्री नवलराज काळे पाठपुरावा करत होते. ऑल इंडिया धनगर समाज महासंघाकडून देखील नवलराज काळे आणि त्यांचे सहकारी यांनी संघर्ष उभा केला होता तो संघर्ष आता कुठेतरी थांबला असून आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून सन्माननीय दिलीप जी रावराणे यांच्या सहकार्यातून व खांबाळे गावतील मंगेश कदम, उमेश पवार महेश चव्हाण, श्रीकृष्ण पवार जगदीश पवार लहू पवार व इतर भाजपाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून या रस्त्याचे काम सुरू झाले आहे.
या कामामुळे दारिये धनगरवाडीचा दळणवळणाचा प्रश्न कायमचा मार्गी लागला आहे. या कामाला हात घालताना नवलराज काळे यांना अनेक टीका टिपणींना सामोरे जावे लागले. अनेक अडचणींचा सामना करावा लागला परंतु श्री काळे यांनी जिद्द सोडली नाही. लोकसभा निवडणुकीच्या आधी सन्माननीय दिलीप रावराणे यांच्या उपस्थितीत काही बैठका पार पडल्या. ज्यांची समाजात उठणे बसण्याची देखील लायकी नाही अश्या काही समाजातील स्वयंघोषित पुढाऱ्यांनी यावेळी नवलराज काळे यांना फोन करून अपशब्द वापरले होते शिवीगाळ केले होते. परंतु नवलराज काळे यांनी त्यांना कोणत्या प्रकारचे उत्तर न देता आपल्या कृतीतून उत्तर देऊ असा निश्चय केला. त्याचप्रमाणे नवलराज काळे समाजाला दिलेला शब्द पूर्ण केली.नवलराज काळे यांच्या वरिष्ठांनी काळे यांना दिले वचन नक्कीच पूर्ण केले आहे त्यामुळे नवलराज काळे यांच्यामुळेच धनगर समाजाचा विकास होऊ शकतो यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. निस्वार्थपणाने काम करणाऱ्या नवलराज काळे यांच्या पाठीशी तालुक्यातील धनगर समाजाने उभे राहावे असे आवाहन आम्ही सर्व युवा वर्ग करत आहोत.
आमदार नितेश राणे साहेब श्री नवलराज काळे साहेब यांचे पुन्हा एकदा खांबाळे दारिये धनगरवाडी यांच्यातर्फे मनापासून आभारी आहोत🙏🙏