हडपिड श्री स्वामी समर्थ मठात १३ डिसेंबर रोजी रक्तदान व मोफत नेत्र तपासणी शिबिर
स्वामी समर्थ मठ, देवगड पत्रकार संघ व नॅब नेत्र रुग्णालय- देवगड यांच्या संयुक्त विद्यमाने उपक्रम
देवगड
श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई संचलित श्री स्वामी समर्थ मठ- हडपीड येथे दत्तजयंती सोहळ्याचे औचित्य साधून शुक्रवार दि. १३ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ९ वा. मोफत नेत्र तपासणी शिबीर व भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम स्वामी समर्थ मठ, नॅब नेत्र रुग्णालय (आठवले कॅम्पस) देवगड व देवगड पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे.
या उपक्रमाचे उद्घाटन देवगड तालुका पत्रकार समितीचे अध्यक्ष अयोध्याप्रसाद गावकर यांच्या हस्ते होणार आहे. रक्तदान शिबिरास इच्छुक रक्तदात्यांनी सहभाग घ्यावा. तसेच नेत्रतपासणी शिबिराचाही नागरिकानी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने श्री स्वामी समर्थ मठ हडपीडचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर राणे, व संस्थापक सचिव नंदकुमार पेडणेकर यांनी केले आहे.