सिंधुदुर्गात ३ व ४ डिसेंबरला “यलो अलर्ट”….
सिंधुदुर्गनगरी
प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई याच्यांकडून प्राप्त माहितीनुसार जिल्ह्यात ३ व ४ डिसेंबरला हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची ३० ते ४० किमी प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यानुसार “यलो अलर्ट” जाहिर करण्यात आला आहे.
फेंगल चक्रीवादळाचा धोका कमी झाला असला तरी त्याचे परिणाम अजूनही हवामानावर दिसून येत आहेत. फेंगल चक्रीवादळाचा समुद्रकिनारपट्टीलगतच्या भागांवर मोठा परिणाम होणार आहे. ऐन थंडीत पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. हवामान विभागाने काही जिल्ह्यांमध्ये अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्या रिमझिम पावसाच्या सरी बरसतील, ३ आणि ४ डिसेंबरला पावसाचा जोर वाढेल. विजांच्या गडगडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी अलर्ट जारी केला आहे. ५ डिसेंबरला पुन्हा पावसाचा जोर कमी होईल.