सावंतवाडी :
सावंतवाडी मळगाव येथील सिल्वर एकर्स या गृहप्रकल्पाचे उद्योजक शशिकांत पेडणेकर यांचे मुंबई येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ही घटना शनिवारी ३० नोव्हेंबरला दुपारी घडली. ते आपल्या कार्यालयात काम करीत असताना त्यांना त्रास जाणवू लागला असता अधिक उपचारासाठी बाजूच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु त्यावेळी त्यांची प्राणजित माळवली.
श्री पेडणेकर यांनी मळगाव रेल्वे स्टेशन परिसरात सिल्वर एकर्स नावाने गृहप्रकल्प यशस्वी केला होता त्यानंतर मळगाव व मुलगा येथे गृहप्रकल्प राबविले होते. सामाजिक कार्यक्रमातही ते कायम सक्रिय होते. त्यांनी आपली मळगाव सिल्वर एकर्स येथील दोन हजार फूट जागा फक्त एक रुपयात वृद्धाश्रमासाठी दिली. यशस्वी उद्योजक म्हणून ते प्रसिद्ध होते. त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा मुलगी असा परिवार आहे.