*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य तथा संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान, पुणे लेखक कवी वि. ग. सातपुते लिखित अप्रतिम काव्यरचना*
*साक्ष कृपाळु*
*************
चैतन्याचीच किरणे सुवर्णकांचनी
प्रात:काळी उष:प्रभा गुलमुसलेली
उधळत येते सौख्याचाच सोहळा
भावनांचे निर्मळ प्रतिबिंब नभाळी
चराचराला अलगदी मिठीत घेता
स्पर्शात ऋतुऋतुंच्या नवी नव्हाळी
भावशब्दातूनी अलवारी झरता
पाझरती लोचने या सांजवेळी
लाघववेळी अव्यक्त नाद निर्झरी
विरक्त मनास या समाधी लागली
हरिभक्त मीराराधा मोहक सुंदर
जणु कन्हैयाची मूर्त निळीसावळी
सांजाळलेल्या सुरम्य अस्ताचली
कृपावंताची कृपाळु साक्ष आगळी
***************************
*रचना १६९*
*#©️वि.ग.सातपुते.( भावकवी )*
*📞 ( 9766544908 )*