You are currently viewing रंग केशरी

रंग केशरी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा.सौ.सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

रंग केशरी

 

हा रंग केशरी जलाशयावर उतरे

ह्या पायघड्या हो कुणास्तव तो पसरे

ही जणू तयारी आगमनाची त्याच्या

जणू टिळा लावण्या भाळी आदित्याच्या…

 

किती शांत किनारी योगी जणू तो बसला

पलिकडे डोंगराआड रवि तो हसला

केशरी मुलामा घेऊन नभ ही नटले

त्या पर्णपताका वृक्षराज विनटले…

 

डोंगरकडांना जरतारी देत मुलामा

तरी रूप तयांचे उठून दिसते “शामा”

पाण्यात पसरूनी पाय योगी बसले

वृक्षांना झेलत पाठीवरती हसले….

 

हा अरूण उदेला, की जाई अस्ताला

किती रूप मनोहर दाखवता तो झाला

डोळ्यात भरूनी घ्यावे त्यास भजावे

एवढेच ठावे, आदित्यास नमावे….

 

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक

(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा