दोडामार्ग-भेडशी येथे कार पलटी होऊन अपघात
दोडामार्ग
तिलारी-भेडशी मार्गावर चालकाचा ताबा सुटल्याने कार पलटी होऊन अपघात झाला. ही घटना आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास भेडशी येथील खालचा बाजार पुलानजीक घडली. सुदैवाने या अपघातात कुणालाही दुखापत झाली नाही. मात्र कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.