इचलकरंजी / प्रतिनिधी
अब्दुललाट (ता. शिरोळ) येथे विद्योदय मुक्तांगण परिवारच्या वतीने सेवांकुर प्रकल्पांतर्गत ऊसतोड मजुरांच्या मुलांच्या शिक्षणासाठी सुरु करण्यात आलेल्या हंगामी साखर शाळेचे उद्घाटन रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रलचे प्रेसिडेंट सतीश पाटील यांच्या हस्ते व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
मराठवाडा , पश्चिम महाराष्ट्र व कर्नाटक सीमाभागातून ऊस तोडीसाठी येणाऱ्या मजुरांच्या मुलांची शिक्षणाअभावी हेळसांड होऊ नये यासाठी विद्योदय मुक्तांगण परिवारच्या वतीने विविध सामाजिक संस्था व दानशूर व्यक्तींच्या मदतीने
दरवर्षी सेवांकुर प्रकल्पांतर्गत हंगामी साखर शाळेचा प्रकल्प राबविण्यात येतो. यंदाच्या वर्षीही सुरु करण्यात आलेल्या या प्रकल्पांतर्गत अब्दुललाट येथे सेवांकुर हंगामी साखर शाळेचे उद्घाटन विविध मान्यवरांच्या हस्ते उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रलचे प्रेसिडेंट सतीश पाटील ,सेक्रेटरी नागेश दिवटे, घनशाम सावलानी, सुरेश रोजे, सुभाष अक्कोळे, सदस्य विकास भोसले यांच्यासह रोटरी सदस्य विकास भोसले, विद्योदय मुक्तांगण परिवारचे अध्यक्ष विनायक माळी, शिक्षक संतोष पाच्छापुरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.यावेळी विद्योदय मुक्तांगण परिवारच्या सार्शा माळी यांनी स्वागत करुन प्रास्ताविकात उसतोड मजुरांच्या मुलांसाठी राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक व विविध कौशल्यपूर्ण उपक्रमांची माहिती दिली.यावेळी उपस्थित मान्यवरांनी ऊसतोड मजुरांच्या मुलांसाठी सुरु असलेल्या सेवांकुर प्रकल्पांतर्गत हंगामी
साखर शाळा प्रकल्पाचे कौतुक करत यासाठी सर्वतोपरी सहकार्य राहील, अशी ग्वाही दिली. यावेळी विविध मान्यवर , विद्यार्थी , ऊसतोड मजूर , ग्रामस्थ व शिक्षिका उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका सुप्रिया ठिकणे यांनी तर आभार शिक्षिका सौ. वर्षा पाटील यांनी मानले.