_*’विज्ञान प्रदर्शन २०२४-२५’ मध्ये माध्यमिक गटात भोसले इंटरनॅशनल स्कूल प्रथम….*_
सावंतवाडी
_५२ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या दहावीतील रेवण गवस व ओंकार गावडे यांनी उत्कृष्ट प्रदर्शन करत माध्यमिक गटातून प्रथम क्रमांक पटकावला. ‘हायड्रोजन जनरेटर’ या संकल्पनेवर आधारित मॉडेल त्यांनी यावेळी सादर केले होते. जि.प.सिंधुदुर्ग, पंचायत समिती, सावंतवाडी व शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित ही स्पर्धा सिंधुदुर्ग सैनिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, आंबोली येथे पार पडली._
_सोबतच ‘स्वच्छता, आरोग्य व घ्यावयाची काळजी’ या विषयावर निबंध स्पर्धासुद्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये भोसले स्कूलची सहावीतील विद्यार्थिनी वेदा राऊळ हिने तृतीय क्रमांक पटकावला. तीनही यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले, अध्यक्षा ऍड.अस्मिता सावंतभोसले व मुख्याध्यापिका प्रियांका देसाई यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या._