*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*दातखिळी……!!मरणाला..!!*
हुंकारात विव्हळत विस्कटत
भयपिसाट गळून जातं
शरीर पोचतं थडग्यात
परिपक्व थरथरत कापतं.!
दातखिळी रूतणा-या नरड्याला
उरल्या प्राणवायूवर सरपटत
रक्तपितं चिरप्राचीन श्वापद
आवळून घोट घेत..!
अडकल्या आत्माच्या जाणिवेने
कोडाच्या डागाचा चंद्र
निपचित श्वापदं विखारत
डोक्यावर गातो मंत्र..!
सजिव चांदण हुंकारत
अभद्र अजिजिनं विव्हळत
परकेही इथे ओळखीचे
दुखावल्या आत्म्यांना हिंडवत..
काजळकाळा डोह कबरीत
फुटली डोळ्यांची कवाडे
दातखिळी मरणाला अवेळी
विश्व आत्म्यांचे उजेडाएवढे…!!
बाबा ठाकूर धन्यवाद
ठाकूरी उवाच ..आठवे..!!