You are currently viewing बंदूक परवाना नूतनीकरण तालुकानिहाय तारखा जाहीर

बंदूक परवाना नूतनीकरण तालुकानिहाय तारखा जाहीर

बंदूक परवाना नूतनीकरण तालुकानिहाय तारखा जाहीर*

सिंधुदुर्गनगरी

जिल्हयातील ज्या बंदूक परवानाधारकांची परवान्यांची मुदत ३१ डिसेंबर रोजी संपत आहे, त्यांनी परवाना नूतनीकरणासाठी येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील उपचिटणीस शाखेत सकाळी १० ते दुपारी १ पर्यंत विहीत नमुन्यातील अर्ज दाखल करण्याचे आवाहन अपर जिल्हादंडाधिकारी नितीन राऊत यांनी केले आहे.

शस्त्र परवाना नूतनीकरणासाठी ए-३ फॉर्म फोटोसह परिपूर्ण माहितीसह सादर करायचा आहे. शस्त्र वापरण्यास शारीरिकदृष्ट्या सक्षम असल्याचे ए-३ फॉर्म नमुन्यात जिल्हा शल्य चिकित्सकांचे प्रमाणपत्र हवे. ए-४ फॉर्म संबंधित पोलीस निरीक्षक पोलीस ठाण्याकडून सही शिक्क्यानिशी

तालुकानिहाय कार्यक्रम असा..

तालुका. नेमून दिलेले दिवस

देवगड २, ३, ४ डिसेंबर २०२४

सावंतवाडी ५, ६, ९ डिसेंबर

दोडामार्ग १०, ११ डिसेंबर

मालवण १२, १३, १६ डिसेंबर

कुडाळ १७, १८, १९ डिसेंबर

कणकवली २०, २३, २४ डिसेंबर

वेंगुर्ले २६, २७ डिसेंबर

वैभववाडी ३०, ३१ डिसेंबर

 

सादर करावा. शस्त्र पडताळणी केल्याचे संबंधित पोलीस ठाणे निरीक्षकांकडील शस्त्र पडताळणी प्रमाणपत्र, सरपंच, पोलीस पाटील, नगराध्यक्ष

यांच्याकडील रहिवासी व वर्तणुकीचा दाखला किंवा आधारकार्ड, मूळ शस्त्र परवाना अर्जासोबत जोडावा. परवाना नूतनीकरण ५ वर्षांसाठी फी २५०० रु. शासन जमा करावी. विलंब झाल्यास प्रतिवर्षीप्रमाणे ५०० रु. दंड आकारण्यात येईल. विलंब झाल्यास सबळ पुरावा अर्जासह सादर करावा. ए-३ हा फॉर्म तहसील कार्यालय येथील सेंतु सुविधा केंद्रात उपलब्ध आहे. अर्ज पोस्टाद्वारे वा तालुक्याच्या ठिकाणी स्वीकारले जाणार नाहीत. नूतनीकरण झालेले शस्त्र परवाने पोस्टाने पाठविले जाणार नाहीत. नेमलेल्या तारखांनाच त्या-त्या तालुक्याच्या परवानाधारकांनी शस्त्र परवान्यांसह उपस्थित राहवे. परवानाधारकांनी नेमून दिलेल्या दिवशी व वेळी (सार्वजनिक सुट्या वगळून कार्यवाही करावी, असे आवाहन केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा