*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*इंद्रायणी काठी…*
इंद्रायणी काठी भक्तिचा महापूर
मनात तू राजा असोनिया दूर
तुझी कीर्त राजा त्रिखंडात गाजे
नमन येथून ज्ञानराजा माझे…
तू आहे माहित आहे रे मजला
म्हणून महाल आहे रे सजला
भक्त येती जाती डोई ठेवतात
मनातील गुज तुला सांगतात…
भोगूनी तू दु:ख भवपार झाला
समाधिस्थ आहे परंतू आजला
मनी तुझ्या काय किती तू भोगले
बोलला तू नाही सोबत तू नेले…
कळतात व्यथा तुझिया मनाच्या
माहित रे कथा अलंकापुरीच्या
अलौकिक काम करोनिया गेला
मनी मानसी तू जनांच्या रुजला…
भोगूनी इतुके दान विश्वासाठी
ध्वजा उभारली चंद्रभागे काठी
जरामरणाच्या सीमा केल्या पार
आम्हासाठी देवा उघडे सदा दार…
कृपा ठेव देवा राजा तू उदार
कर आम्हालाही कर भवपार
सदैव आहे तू माझ्या हृदयात
ज्ञानराजा माझा घ्यावा प्रणिपात…
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)