You are currently viewing केंद्र शासनाची कॉमन रिव्ह्यू मिशन टीम सिंधुदुर्गात

केंद्र शासनाची कॉमन रिव्ह्यू मिशन टीम सिंधुदुर्गात

*सिंधुर्गातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना दिली भेट*

सिंधुदुर्ग :

राष्ट्रीय आरोग्य मिशन अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या आरोग्य विभागाच्या विविध योजना व आरोग्य कार्यक्रमांच्या अंमलबजावणीची पहाणी व आढावा घेण्यासाठी केंद्र शासनाची कॉमन रिव्ह्यू मिशन टीम शनिवारी २६ नोव्हेंबरला सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाली आहे.

जिल्ह्यातील विविध आरोग्य संस्थांमध्ये भेटी देऊन आरोग्य कार्यक्रमांच्या प्रचार प्रसिद्धी बाबत पाहणी करण्यासाठी राज्य माहिती शिक्षण व संपर्क विभाग पुणे चे मा.उपसंचालक डॉ.कैलास बाविस्कर व सहाय्यक संचालक डॉ.संजय जठार पूर्वतयारीच्या अनुषंगाने भेट दिली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सई धुरी व सर्व जिल्हास्तरीय अधिकारी उपस्थित होते.

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाचे मार्फत १६ व्या कॉमन रिव्ह्यू मिशन पथकाने जिल्ह्यातील विविध आरोग्य केंद्रांना भेट देवून आरोग्य कार्यक्रमांचे अंमलबजाणी चा आढावा घेण्यात आला. यावेळी पथक प्रमुख मा.सह संचालक mohfw डॉ.विनय गर्ग यांचे स्वागत मा.उपसंचालक डॉ.दिलीप माने, कोल्हापूर मंडळ कोल्हापूर यांनी केले. जिल्ह्यातील आरोग्य निर्देशकांच्या बाबत विस्तृत माहिती डॉ.सई धुरी, जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, डॉ.श्रीपाद पाटील जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

या पथकामार्फत जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र पणदूर, आरोग्य उपकेंद्र वेताळ बांबर्डे, महिला व बाल रुग्णालय कुडाळ, प्राथमिक आरोग्य केंद्र बांदा, आपला दवाखाना कुडाळ, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथे भेट देऊन आरोग्य विषयक कार्यक्रमांचा आढावा घेण्यात आला. सदर पथकामध्ये डॉ.सचिन कुमार पाटील, डॉ. आक्रम खान, डॉ.अभय दहिया, डॉ.मनीषा शर्मा, डॉ. बिजय कुमार मलिक यांचा समावेश आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा